Categories
Uncategorized

From water to rain

पाण्या पावसाचा अभ्यास

मागच्या दोन आठवड्यापासून विज्ञान घरातील मुलं पाणी व पावसाचा अभ्यास करण्यात दंग आहेत.
सुरुवातीला मुलांनी स्वतः ला दिवसभरात किती पाणी लागते याचा अंदाज काढला आणि नंतर प्रत्यक्षात पाणी मोजून किती पाणी लागते याचा टेबल बनवला. तसच पूर्ण कुटुंबाला एका दिवसात किती पाणी लागते हे पण काढले. नंतर प्रत्यक्षात ग्राम पंचायत मध्ये जाऊन गावाची लोकसंख्या, एकूण घरे अशी माहिती काढली आणि त्यावरून पूर्ण गावाला किती पाणी लागते याचा हिशोब काढला. हे करताना सरासरी काढणे, टक्केवारी काढणे, अंदाज करणे, मोजमाप करणे, पाय चार्ट बनवणे व संवाद करणे हे मुलांना शिकायला मिळाले.
मग मुलांना विचारलं ” जस आपण पाणी मोजू शकतो तस पाऊस मोजू शकतो का?” आणि या चर्चेतून पर्ज्यन मापक बनवायचे ठरवले. आणि आता बऱ्याच मुलांनी ते बनवून आपल्या गच्चीवर बसवले आहे आणि रोज त्याची नोंद ठेवत आहेत.
शेवटी मग गटात काही पाण्याचे विषय देऊन जसे की,पूर्वी गावात पाण्याची काय व्यवस्था होती, गावाला कसा पाणी पुरवठा होतो, जवळचे पाण्याचे साठे, बोअरवेलची गावातून माहिती जमा करण्यास सांगितली.
मुलांनी माहिती जमा करण्यासाठी आधी काही प्रश्न काढले व त्याआधारे माहिती मिळवली. आता पुढच्या सत्रात मुलं सर्वांना मिळवलेली माहिती आणि आपले अनुभव सांगणार आहेत.
या सगळ्या प्रोसेस मध्ये मुलांना खूप गम्मत आली आणि शिकायला पण मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *