Categories
Uncategorized

कॅपिलरी ॲक्शनचा जुगाड 🧐🤔😇

त्यादिवशी घरातील फ्रिजच्या फ्रिजरमध्ये बराच बर्फ जमा झाल्याचे त्याला डिफ्रॉस्ट करावे लागेल असे दिसले. दरवेळी डिफॉस्ट केल्यावर येणारी अडचण म्हणजे बर्फ वितळल्याने तयार झालेले पाणी फ्रीजच्या मागे दिलेल्या बॉक्समध्ये जमा होते , पण फ्रिजरमधला बर्फ जास्त असेल तर त्याचे पाणी त्या बॉक्सच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त असते आणि मग काही वेळाने तो बॉक्स ओव्हरफ्लो होऊन पाणी फरशीवर वहायला लागते. यावर काय -काय उपाय करता येतील असा विचार करायला सुरुवात केली. पहिला पर्याय आला तो लहान, बारीक नळीचा, एक टोक या बॉक्समध्ये बुडवायचे आणि दुसऱ्या टोकाने पाणी ओढून तो बॉक्स रिकामा करायचा पण नळी नव्हती . मेंदूला आणखी थोडा ताण दिला तर एक आयडिया आली की दोरी किंवा हात रुमाल वापरून ‘कॅपिलरी ॲक्शन’ या वैज्ञानिक संकल्पनेचा वापर करून हा बॉक्स रिकामा करता येईल. आयडिया करता येण्यासारखी वाटली ,मग काय लगेच इम्प्लिमेंटेशन करायला सुरुवात केली. एक हात रुमाल, एक छोटे पातेले घेतले . रुमाल ओला करून घेतला आणि त्याचे एक टोक बॉक्सच्या तळाशी नेले आणि दुसरे टोक खाली फरशीवर ठेवलेल्या पातेल्यात टेकवले. थोड्यावेळाने साधारण एक ते दीड तासाने बघितले तर बॉक्समधले अर्धे पाणी रिकामे झाले होते आणि खाली पातेल्यात ते जमा झालेले दिसले. सो माय आयडिया वर्कड . येस् sss ! आनंद झाला !

मग मनात प्रश्न आला की हे पण ‘ॲप्लीकेशन ऑफ नॉलेज टू डेली लाईफ’ आहे का? तर उत्तर आले, हो नक्कीच आहे कारण विज्ञानात शिकलेली, समजून घेतलेली संकल्पना मी रोजच्या आयुष्यातील छोटी समस्या सोडवण्यासाठी वापर केला आहे म्हणजेच हे ॲप्लीकेशन ऑफ नॉलेज आहे. अशा प्रकारे मिळवलेल्या ज्ञानाचे उपयोजन करणे आमच्या कामाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे आणि वर्गात कोणतेही सत्र घेतांना आम्ही याचा भरपूर विचार करत असतो की, हे मुलांना कसे समजावता येईल, काय करता येईल म्हणजे आमची मुलं पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर करून छोट्या , मोठ्या समस्या सोडू शकतील ? त्या दिवशी आमच्या फ्रिजच्या माध्यमातून हे कोडे उलगडल्यासारखे वाटले . अशा प्रकारचे उदाहरण देऊन आपण मुलांना नक्कीच समजावू शकतो की, व्हॉट डज इट मीन बाय एप्लीकेशन ऑफ नॉलेज टू डेली लाईफ . -अनिरुद्ध पाटील

A Hack Using Capillary Action 🧐🤔😇

That day, a lot of ice had accumulated in the freezer section of our fridge, and it looked like it needed to be defrosted. One recurring problem with defrosting is that the melted ice turns into water and collects in the tray given at the back of the fridge. But if there is too much ice, the amount of water exceeds the tray’s capacity. After a while, the tray overflows, and water starts spilling onto the floor.

So, I began to think of possible solutions.
The first idea was to use a thin pipe—submerge one end in the tray and suck water out from the other end to empty it. But there was no pipe available.

I gave my brain a little more pressure, and an idea struck: I could use a rope or a handkerchief to apply the scientific concept of capillary action to empty the tray. The idea seemed workable. So, I immediately started implementing it.

I took a handkerchief and a small vessel. I wetted the handkerchief and placed one end at the bottom of the water tray and the other end into the vessel placed on the floor. After a while—around an hour to an hour and a half—I checked and saw that half of the water from the tray had transferred into the vessel on the floor.

So—my idea worked! Yesss! I was thrilled!

Then a question popped into my mind: Is this also an ‘application of knowledge to daily life’?
The answer came: Yes, absolutely. Because I applied a scientific concept—something I had learned and understood—to solve a small, everyday problem. That is exactly what “application of knowledge” means.

Using acquired knowledge in this way is one of the goals of our work. While conducting any classroom session, we give serious thought to how we can explain things to children, how we can help them apply what they’ve learned to solve real-life problems—big or small.

That day, it felt like this puzzle got solved through our fridge.
And using such examples, we can definitely help children understand:
What does it mean to apply knowledge to daily life? – Aniruddha Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *